मानव विकास निर्देशांक
मानव विकास निर्देशांक (HDI )
- यु.एन.डी.पी.ने 1990 मध्ये पहिल्यांदा मानव विकास अहवाल जाहीर केला. त्यामध्ये विविध देशांचे मानव विकास निर्देशांक मोजण्यात आले होते. त्यामागील प्रेरणा पाकिस्तानी अर्थतज्ञ महबूब-उल-हक आणि अमर्त्य सेन यांची होती.
- महबूब-उल-हक यांना ‘मानव विकास निर्देशांकाचे जनक’ म्हणून संबोधले जाते.
- 2010 मध्ये हा निर्देशांक ज्या घटकांवरून काढला जातो, त्यात बदल करण्यात आला. त्यानुसार, मानव विकास निर्देशांक पुढील तीन निकष (dimensions) व त्यांच्याशी संबंधित चार निर्देशक (indicators) यांवरून काढला जातो.
आरोग्य (Health) –
देशाचा आरोग्याचा स्तर मोजण्यासाठी जन्माच्या वेळेचे आयुर्मान ही निर्देशक वापरला जातो.
शिक्षण (Education) –
देशाचा शैक्षणिक स्तर मोजण्यासाठी पुढील दोन निर्देशक वापरले जातात.
- 25 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या प्रौढांची सरासरी शालेय वर्षे (Mean years of schooling), आणि
- 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांची अपेक्षित शालेय वर्षे (Expected years of schooling). शिक्षणाचा निर्देशांक या दोन्ही निर्देशकांचा भूमितीय मध्य असतो.
जीवनमानाचा दर्जा (Living Standards) –
- देशाच्या जीवनमानाचा दर्जा मोजण्यासाठी दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पन्न (Per capita GNI) हा निर्देशक वापरला जातो.
- प्रथम वरील चार निर्देशांकासाठी किमान व कमाल मूल्ये ठरविली जातात. त्यांना गोलपोस्ट म्हणतात. प्रत्येक देश या मुलाच्या दरम्यान कोठे आहे, यानुसार त्या देशाचा मानव विकास निर्देशांक ठरवला जातो. त्याचे मूल्य 0 ते 1 दरम्यान व्यक्त केले जाते. 1 च्या जवळ असलेले मूल्य मानव विकासाचा उच्च स्तर दर्शवितो.
- 2018 च्या मानव विकास अहवालनुसार भारताचा मानव विकास निर्देशांक 0.640 इतका होता. 189 देशांच्या सूचीमध्ये भारताचा क्रमांक 130 व होता. प्रथम क्रमांकावर नॉर्वे (0.953) होता.
- भारताची गणना मध्यम मानव विकास (medium human development) गटात करण्यात आली.
असमानता-समायोजित मानव विकास निर्देशांक (In-equalitiy adjusted Human Development Index: IHDI) :
- 2010 च्या अहवालात हा निर्देशांक लागू करण्यात आला. हा निर्देशांक मानव विकास निर्देशांकाप्रमाणेच काढला जातो.
- मानव विकास निर्देशांक काढतांना प्रत्येक निर्देशकाचे सरासरी मूल्य धरले जात असते. मात्र लोकसंखेमध्ये त्याबाबतीत मोठी असमानता असते. त्यामुळे IHDI काढतांना ही असमानता समयोजित (adjust) केली जाते.
- देशात चारही निर्देशकांच्या बाबत पूर्ण समानता असेल तर HDI आणि IHDI समान येतील. मात्र IHDI चे मूल्य HDI पेक्षा जसजसे कमी होईल तशी असमानता वाढत जाईल.
लैंगिक असमानता निर्देशांक (Gender Inequality Index: GII) :
- हा निर्देशांक 2010 च्या अहवालात लागू करण्यात आला. त्याने 1995 पासून लागू करण्यात आलेल्या लिंग-आधारित विकास निर्देशांक (GDI) व लिंग सबळीकरण परिमाण (GEM) यांची जागा घेतली आहे.
- हा निर्देशांक 3 निकष व 5 निर्देशांकांच्या आधारे काढला जातो.
जनन आरोग्य (Reproductive health)-
- ते मोजण्यासाठी पुढील निर्देशक वापरले जातात-
- माता मर्त्यता (Maternal mortality)
- किशोरवयीन जन्यता (Adolescent fertility)-
सबळीकरण (Empowerment) –
- त्याचे प्रमाण मोजण्यासाठी पुढील निर्देशक वापरले जातात-
- संसदीय प्रतिनिधित्व (Parliamentary representation)
- शैक्षणिक स्तर (Educational attainment) : माध्यमिक व वरील स्तरावरील
- श्रम बाजार (Labour market) : त्याचे प्रमाण श्रम शक्तीतील सहभागावरून मोजले जाते.
बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक (Multi-Dimensional Poverty Index: MPI) :
- या निर्देशांकाची सुरुवात यु.एन.डी.पी. आणि अॅक्सफर्ड विधापीठ यांनी मिळून जुलै 2010 मध्ये केली. या निर्देशांकाने 1997 पासून लागू करण्यात आलेल्या मानवी दारिद्र्य निर्देशांकांची (HPI) जागा घेतली.
- विकासाप्रमाणेच दारिद्र्य सुद्धा बहुआयामी (multi-dimensional) असते. हेडलाईन आकडे दरिद्रयाचा बहुआयामीपणा दडवून ठेवतात. त्यामुळे या निर्देशांकाची रचना HDI च्या तिन्ही निकषांच्या बाबतीत आढळणारी बहुवंचितता (multiple deprivations) ओळखण्यासाठी करण्यात आली आहे.
- हा निर्देशांक 3 निकष व 10 निर्देशकांच्या सहाय्याने काढला जातो.
आरोग्य (Education) –
त्याचा स्तर मोजण्यासाठी
- पोषण
- बाल मर्त्यता
शिक्षण (Education) –
त्याचा स्तर मोजण्यासाठी
- शालेय वर्षे
- बालक पटसंख्या
जीवनमान दर्जा (Living Standards) –
त्याचा स्तर मोजण्यासाठी
- मालमत्ता
- वीज
- पाणी
- स्वच्छतागृह
- स्वयंपाकाचे इंधन
- जमीन (अस्वच्छ जमीनीवरील जगणे)
Comments
Post a Comment